VIDEO | अभिनेत्री करिना कपूर आणि अमृता अरोरा कोरोना पॉझिटिव्ह, पार्टीत दिसल्या होत्या एकत्र

2021-12-13 4

#KareenaKapoor #AmritaArora #CoronaPositive #MaharashtraTimes
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर आणि तीची जवळची मैत्रीण अमृता अरोरा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. अलीकडेच करिना आणि अमृता या दोघीही लॉकडाऊननंतर वेगवेगळ्या पार्ट्यांमध्ये हजेरी लावताना दिसल्या. त्यामुळे ही बातमी कळताच बॉलिवूडमध्ये आता खळबळ उडाली आहे. बीएमसी मुंबईने करीना कपूर आणि अमृता अरोरा यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना RTPCT चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. बीएमसी त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करत आहे. यापूर्वी करिना कपूर तिच्या गर्ल गँगसोबत पार्टी करताना दिसली होती. या पार्टीत तीची बहीण करिश्मा कपूर, मलायका अरोरा सामील झाली होती. ही पार्टी अनिल कपूरची मुलगी रिया कपूरच्या घरी ठेवण्यात आली होती. जिथे सगळ्यांनी एकत्र मस्त वेळ घालवला होता.

Videos similaires